'राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा'

दिल्लीत जाण्याएवढं महाराष्ट्रात काय झालंय? राऊतांचा भाजपला सवाल
Sanjay Raut News, Sanjay Raut on President Rule
Sanjay Raut News, Sanjay Raut on President RuleSanjay Raut
Summary

दिल्लीत जाण्याएवढं महाराष्ट्रात काय झालंय? राऊतांचा भाजपला सवाल

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले असता त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चप्पलफेक केली. सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. दिल्लीत जाण्याएवढं महाराष्ट्रात काय झालं आहे? असा सवालही त्यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे. (Sanjay Raut on President Rule)

Sanjay Raut News, Sanjay Raut on President Rule
सेना-भाजप वाद चिघळणार? बॅनरबाजीने भाजप करणार सेना नेत्याची पोलखोल

यावेळी ते म्हणाले, हे सर्व महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे. काही समस्या आणि प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं. यूपीमध्ये अत्याचार झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावायाची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोन्हीकडे एकत्र लावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दोन चार लोक दिल्लीला जातात. माध्यमांना प्रतिक्रिया देतात आणि महाराष्ट्राची बदनामी करतात, असेही त्यांनी सांगितले आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे याच्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संजय पांडे हे एक निष्पक्ष आणि सक्षम पोलिस अधिकारी आहेत. ते प्रामाणिक अधिकार आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आरोप करु नयेत, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या राज्यात सुरु असलेल्या हनुमान चालीसा पठणावरून सध्या राजकारण तापलं आहे. यावरून राऊतांनी हे लोक फ्रॉड आणि बोगस असुन आम्हाला हनुमान चालीसा पठण कसे करावे हे सांगत असल्याचे म्हणत खुलासा केला आहे. ट्विटद्वारे त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा विषय बाहेर काढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com