Sanjay Raut : लोकांनी दुसऱ्या विषयाकडं वळावं आणि शिवरायांचा अपमान..; काय म्हणाले राऊत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut vs Basavaraj Bommai

'लोकांनी दुसऱ्या विषयाकडं वळावं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान विसरावा, असं त्यांचं चाललंय.'

Sanjay Raut : लोकांनी दुसऱ्या विषयाकडं वळावं आणि शिवरायांचा अपमान..; काय म्हणाले राऊत?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील (Maharashtra-Karnataka Border) 40 गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Karnataka CM Basavaraj Bommai) केलाय. सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

हेही वाचा: Maharashtra Politics : महाराष्ट्रातील माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे की..; असं का म्हणाले शंभूराज देसाई?

बोम्मईंच्या दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय. 'शिवरायांच्या अपमानाचा विषय मागं पडावा, म्हणून बोम्मईंना पुढं करुन महाराष्ट्रातल्या सोलापूर, जत, अक्कलकोटवरती हक्क सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजेच, लोकांनी दुसऱ्या विषयाकडं वळावं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान विसरावा, असं त्यांचं चाललं आहे.'

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

भाजपचा मुख्यमंत्री जिथं भाजपचं राज्य आहे, तिथं कोणतीही टीका करताना दिसत नाही. कधी पाहिलंय का तुम्ही? योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला, कधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला असं कधीच होत नाही. भाजप हा शिस्तबध्द पक्ष आहे. त्यांची ठरलेली स्क्रिप्ट असते, त्यामुळं लक्ष विचलित करण्यासाठीच बोम्मईंनी ते वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील एक इंचही भूमी आम्ही कोणाला देणार नाही. शिवसेननं ६९ हुतात्मे दिले. आम्हालाही हुतात्म पत्करावं लागलं तरी चालेल, आम्हाला तुरुंगाची भीती नाही, असा इशारही राऊत यांनी यावेळी दिला. शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. बोम्मईंच्या हल्ल्यामागं मोठं षडयंत्र असून विषय वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.