Sanjay Raut on Thailand Bank
Sanjay Raut on Thailand Bank e sakal

'थायलंड बँकेत पैसे कोण जमा करतंय?', राऊतांच्या नव्या आरोपाने खळबळ

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे तपास यंत्रणांविरोधात वारंवार भूमिका घेतात. आज त्यांनी किरीट सोमय्यांसोबतच (Kirit Somaiya) तपास यंत्रणांवर देखील आरोप केले आहेत. काही जण ईडी, सीबीआयचा वापर करून लोकांना धमक्या देतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळून हे बँक ऑफ थायलंडमध्ये जमा करतात. हे प्रकरण लवकरच उघडकीस आणणार आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Sanjay Raut on Thailand Bank
CBI ची इजिप्तमध्ये मोठी कारवाई! निरव मोदीच्या निकटवर्तीयाला आणलं भारतात

किरीट सोमय्यांनी पैसे गोळा करून त्याचं काय केलं? हा पोलिस तपासाचा भाग आहे. भाजप ज्याप्रकारचे आरोप करतेय आम्ही त्याप्रकारचे आरोप करत नाही. तुम्ही इतरांकडून पैसे गोळा केले. राजकीय सुडाच्या भावनेनं आम्ही आरोप करत नाही. मनात भीती नसेल तर पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. तुम्ही पळताय, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताय. कायद्यापासून पळू नका असं स्वतः म्हणता आणि तुम्हीच पळ काढताय. तुमची अनेक प्रकरणे समोर येणार आहेत, असा इशारा राऊतांनी किरीट सोमय्यांना दिला.

काही लोकांची माफिया टोळा लोकांना ईडी, तपास यंत्रणांच्या धमक्या देतात. इथं ईडी सीबीआयकडून तुरुंगात टाकण्याच्या धमक्या द्यायच्या आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. ते पैसे बँक ऑफ थायलंडमध्ये जमा केले जातात. हे प्रकरण लवकरच समोर आणणार आहे. विदेशात पैसे कोण पाठवते? हा लवकरच खुलासा करणार आहे. याबाबत लवकर पंतप्रधान मोदींसोबत बोलणार आहे, असे नवीन आरोप देखील संजय राऊतांनी केले आहे.

आम्ही कधीच कंबरेखाली वार करत नाही. आमच्यावर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहे. आम्ही कोणाच्या कुटुंबीयांवर राजकीय बदल्याच्या भावनेतून कारवाई करणार आहे. आयएनएस विक्रांतचे प्रकरण राजकीय सूड नाही. हे प्रकरण देशासोबत जुळलेले आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com