Sambhajiraje News | राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजे २०२४ च्या निवडणुकीच्या शर्यतीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje
राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजे २०२४ च्या निवडणुकीच्या शर्यतीत?

राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजे २०२४ च्या निवडणुकीच्या शर्यतीत?

संभाजीराजे छत्रपतींच्या खासदारकीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. शिवसेनेकडून राजेंना उमेदवारी देण्यासाठी पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. मात्र राजेंनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापुरातलाच दुसरा उमेदवार जाहीर केल्याने संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय. दुसरीकडे संभाजीराजे समर्थकांनी आता हा मुद्दा लावून धरला आहे. (Sambhajiraje Chhatrapati)

हेही वाचा: छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून...; निलेश राणेंची टीका

संभाजीराजे समर्थकांनी एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष २०२४ असा मजकूर छापण्यात आला आहे. यामुळे आता संभाजीराजे कोणती भूमिका घेणार? अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ते ठाम राहणार का? संभाजीराजेंची पुढची रणनीती काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा: "पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही"; तेव्हाच संभाजीराजेंनी जाहीर केलं होतं

३ मे रोजी संभाजीराजेंच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला. त्यानंतर त्यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली आणि खासदारकीची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी सर्व पक्षांना पाठिंब्यासाठी आवाहन केलं. राष्ट्रवादीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवला.

हेही वाचा: ठाकरे सरकारने संभाजी राजेंना दगा दिला; मराठा समन्वयकांचा आरोप

शिवसेनेकडे असलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर संजय राऊतांचं नाव फिक्स आहे. तर दुसऱ्या जागेसाठी संभाजीराजेंसोबत चर्चा सुरू होती. मात्र शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी संभाजीराजेंना पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. त्यांनी या अटीवर प्रत्यक्ष कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यानंतर आता काल शिवसेनेने कोल्हापुरातल्याच दुसऱ्या नेत्याला उमेदवारी दिल्याचं जाहीर केलं आहे.

Web Title: Sambhajiraje Chhatrapati Kolhapur Shivsena Rajyasabha Elections Supporters Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top