शरद पवार-संजय राऊत भेट, राऊतांनी दिली 'ही' माहिती | Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut sharad pawar

शरद पवार-संजय राऊत भेट, राऊतांनी दिली 'ही' माहिती..

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर (silver oak) दाखल झाले होते. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत सपत्नीक पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले. या भेटीनंतर आता संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. काय म्हणाले राऊत..

ST संपावर लवकरच तोडगा निघेल

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. यात प्रामुख्याने एसटी संपावर चर्चा झाली. दरम्यान ST संपावर लवकरच तोडगा निघेल असे राऊत म्हणाले. तसेच एसटी संपात आगीत तेल ओतण्याच काम कोणी केलं हे सर्वांना माहित आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

हेही वाचा: हाच तो दिवस... फडणवीसांच्या 'त्या' सरकारची आज 2 वर्षे!

हा विषय पवार साहेबांशी चर्चा करण्याइतका गंभीर नाही.

दरम्यान परमबीर सिंह प्रकरणी संजय राऊत यांनी सांगितले की, हा विषय पवार साहेबांशी चर्चा करण्याइतका गंभीर नाही. राज्यात इतरही महत्वाचे विषय आहेत. त्या विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली.

हेही वाचा: नवाब मलिक अचानक दुबईला का गेले?

दिवाळीच्या काळात शरद पवार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटता आले नाही. पवार आता मुंबईत आलेले आहेत. आज अगदी सकाळी 9 च्या आसपास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत - शरद पवार यांच्यामध्ये बैठक एक चर्चेचा विषय आहे.

loading image
go to top