'नेहरूंना EDची नोटीस पाठवल्याशिवाय यांचा आत्मा शांत होणार नाही'

काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय, राऊतांचा केंद्राला सवाल
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSanjay Raut
Summary

काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय, राऊतांचा केंद्राला सवाल

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड (national herald case) या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. दरम्यान, ही नोटीस पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या 'रोखठोक' मधून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते. नेहरूंचा आत्माच त्यात गुंतला होता. निर्भीड असणारे नेहरु कोणत्याही टीकेला ते घाबरत नव्हते. ‘नॅशनल हेराल्ड’ने त्याच स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार केला. हल्ली राज्यकर्ते व पत्रकार यांचे तसे कमी जमते, परंतु नेहरूंनीच यासंबंधी काय सांगितले आहे ते आज दिले तर ते उचित ठरावे, असं म्हणत त्यांनी मोदी-शाह यांना अप्रत्यक्षपणे राजकारणातील व्यापारी म्हटले आहे. त्यामुळे नेहरूंना EDची नोटीस पाठवल्याशिवाय यांचा आत्मा शांत होणार नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. यावेळी माध्यामांशी बोलतानाही राऊतांनी केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.

काश्मिरमध्ये 20 पोलिसांची हत्या होते मात्र देशाच्या गृहमंत्र्यांना त्याची पर्वा नाही, काश्मीरमधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना देशातील केंद्र सरकार सत्तेची आठ वर्ष साजरी करण्यात व्यस्त आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय, असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut latest News)

Sanjay Raut News
आम्हाला कुणीही अडवू शकत नाही, राज ठाकरेंचा कार्यकर्ता पोहचला अयोध्येत

सध्या काश्मीर धुमसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. मात्र केंद्राचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात राऊत म्हणाले, काश्मीरची सध्याची परिस्थीती गंभीर आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना केंद्रातील भाजप सरकार मात्र सत्तेची आठ वर्ष साजरी करत आहे. मात्र, असे असले तरी शिवसेना पूर्ण ताकतीने काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभी आहे, असं आश्वासनही राऊतांनी दिलं आहे. काश्मिरी पंडितांना हवी ती मदत महाराष्ट्र सरकार पुरवणार असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, 15 जूनच्या आयोध्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज अयोध्येला जाणार आहे. आयोध्या दौऱ्यात राजकारण होणार नाही. काश्मीर जळत आहे आणि दिल्लीतले राज्यकर्ते चित्रपट प्रमोशनमध्ये गुंग आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काश्मिरी नागरिकांच्या अक्रोशाकडे केंद्र सरकारचा दुर्लक्ष करत आहे. येथे होणारा काश्मिरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकाराच्या कानामध्ये जात नाही का? असा सवालही खासदार राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut News
काश्मिरी पंडितांच्या पाठिशी मुस्लीम समाज, मुंबईत मशिदीबाहेर निदर्शनं

काय म्हणाले खासदार राऊत 'रोखठोक'मध्ये

नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अरुण जेटली अर्थमंत्री असताना याप्रकरणी चौकशी झाली. दम नाही असं त्यांचं मत मांडत संपूर्ण प्रकरण बंद केलं. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेतले पाहिजे. 1 एप्रिल 2008 रोजी हे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडे होती. पीएम केअर फंडापासून भाजपच्या खजिन्यात जमा होणाऱ्या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे. …पण नेहरूंचा ‘हेराल्ड’ गुन्हेगार ठरला! पंडित नेहरूंना ई.डी., सीबीआयची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल! अशी टीका राऊतांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com