
नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून शिवसेनेतील (Shiv Sena) आमदारांनी बंड पुकारला. त्यांच्या या बंडाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोध केला. विरोध करताना अपशब्दांचाही वापर केला. यामुळे बंड पुकारणाऱ्या आमदारांनी संजय राऊतांमुळे बंड पुकारल्याचा आरोप केला. एक एक करून सर्वजण राऊतांवर आरोप करू लागले. या आरोपांना संजय राऊतांनी (Sanjay Raut) उत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर संजय राऊत प्रथमच नागपुरात आले. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्यावर झालेल्या आरोपांबद्दल मत व्यक्त केले. मी माझ्या शिवसेनेसाठी भांडलो. बंड केलेल्या आमदारांची बाजू मांडली असती तर त्यांचा प्रवक्ता झालो असतो, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
मी शिवसेनेची (Shiv Sena) बाजू मांडली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची बाजू मांडली. शिवसेनेची बाजू मांडणे गुन्हा असेल तर मी त्यांचा अपराधी आहे, असेही संजय राऊत म्हणाले. बंड केलेल्या आमदारांनी संजय राऊत यांनी शिवसेना संपवली, असा आरोप केला होता. तसेच राऊतांच्या वक्तव्याने आम्ही दुःखी झाल्याचेही ते म्हणाले होते. याला उत्तर देताना ते बोलत होते.
सरकार पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला
माझ्यावर सरकार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला. धमक्याही देण्यात आल्या. मात्र, मी त्यांच्या दबावाला किंवा धमक्यांना बळी पडलो नाही. माझ्यावर कसा दबाव टाकण्यात येत आहे, याची माहिती देण्यासाठी व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले होते, असे संजय राऊत म्हणाले.
सरकारबद्दल लोकांच्या मनात साशंकता
या सरकारबद्दल लोकांच्या मनात साशंकता आहे. शिवसेनेला संपवण्यासाठी हे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, त्यांचा हा उद्देश कधीही पूर्ण होणार नाही. ज्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आहे त्या पक्षाचे ते नाहीत. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे (Anand Dighe) हे आमचे गुरू असल्याचे ते म्हणत आहेत. आनंद दिघे हे शिवसेनेचे होते. बाळासाहेब ठाकरे यांचे होते. त्यामुळे बंड पुकारणारे आमदार शिवसेनेचे नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.