Sanjay Raut statement on Adani and Ambani : शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईसह महाराष्ट्र लाडक्या उद्योगपतींना विकल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. शेकापसारखे पक्ष जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र टिकून आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.