संजय राऊत | विदर्भात लवकरच फेरबदल; नागपुरात तळ ठोकणार

आम्हाला मराठी कोणी शिकवू नये’ असे सांगून राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना पुन्हा डिवचले.
Sanjay Raut
Sanjay RautSanjay Raut

नागपूर : पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नागपूरला येण्यापूर्वी विदर्भाबाबत चर्चा झाली. विदर्भात लक्ष देण्यास सुरुवात करीत असून, लवकरच संघटनात्मक फेरबदल करणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

विदर्भाचा मंत्रिपदाचाही बॅकलॉगही लवकरच भरून काढला जाईल. निवडणुका येणार असल्याने इकडे येणे होईल पण, संघटनात्मक बांधणीसाठीच नागपुरात तळ ठोकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या पुतणीच्या विवाहानिमित्त खासदार राऊत येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. ‘कोणीही उठून आमच्या विरोधात टाळूला जीभ लावत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मी जे काही बोललो ती भाषा अगदी सौम्य होती. कोणाला ती कळली नसेल तर त्यात आमची चूक नाही. आम्हाला मराठी कोणी शिकवू नये’ असे सांगून राऊत यांनी भाजपच्या (BJP) नेत्यांना पुन्हा डिवचले.

Sanjay Raut
राऊत नागपुरात आल्याने भाजपात धास्ती; पोलिस आयुक्तांची घेतली भेट

मुंबईतील पत्रकार परिषदेत वापरलेल्या भाषेवरून त्यांना ट्रोल केले जात आहे. याबाबत विचारणा केली असता महाराष्ट्रद्रोही, मराठीद्वेष्टे, भ्रष्टाचारी आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी कायम द्वेष असतो, अशा लोकांना जी भाषा समजते, त्याच भाषेत आपण बोललो, असे ते म्हणाले. सेनेची वेगळी भाषा असेल पण ‘हजार मारा, आणि एक मोजा’ अशा लायकीचे काही लोक भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रद्रोही राजकारण करीत आहेत, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

आम्हाला बौद्धिक देण्याची गरज नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही. आम्हाला फार बौद्धिक देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांचा पक्ष रोज झिजतो आहे. त्याची काळजी घ्यावी, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut
Hijab : बँक अधिकारी मुस्लिम विद्यार्थिनीला म्हणाले, ...तरच पैसे देणार

कॉंग्रेसला सोबत घेण्याची भूमिका आमचीच

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे साडेचार तास चर्चा केली. देशातील राजकीय स्थिती, विकास, आर्थिक विषयांसह देशाच्या राजकारणावर देखील ते आपसात बोलले. या दोन नेत्यांसह अन्य नेतेही लवकरच भेटणार आहेत. काँग्रेसखेरीज आघाडी होईल, असे आम्ही कधीही बोललो नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडीचा विचार व्यक्त करताच काँग्रेसला सोबत घ्यावे, अशी भूमिका मांडणारा शिवसेना पहिला पहिला पक्ष होता, असा दावाही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com