esakal | आम्हाला आता याचीच काळजी - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Speak After Devendra Fadanvis Press Conference

आम्हाला आता याचीच काळजी - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत आता याचीच आम्हाला काळजी असल्याचा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. यानंतर संजय राऊत बोलत होते.


अडीच वर्षाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

संजय राऊत म्हणाले,' राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात येत असेल तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ! फडणवीसांच्या वक्तव्यावर आता फक्त शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेच बोलतील, मी काही बोलणे योग्य नाही. तसेच, त्यांनी शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सिल्व्हर ओक या निवासस्थानी पाहिली असल्याचे सांगत त्यांचा शब्द न शब्द ऐकला असल्याचे म्हटले.  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनाभवन दादर येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

रजनीकांत म्हणतात, हा माझ्या विरोधात भाजपचा डाव; तमीळनाडूत वाद उफाळला

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी अडीच वर्षाचा निर्णय माझ्यासमोर झालाच नसल्याचे त्यांनी म्हटले, वरिष्ठांनीही कधी यावर कोणाला शब्द दिला नव्हता. अडीच वर्षाच्या निर्णयावर एकदा बोलणी फिस्कटलीही होती असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.