"लायकी नसताना लोक मुख्यमंत्री होतात" तर संजय राऊतांकडून अजित पवारांना CM पदासाठी शुभेच्छा

sanjay raut
sanjay rautesakal
Updated on

शिवसेनेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवारांनी शुक्रवारी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी नाव नघेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

sanjay raut
Jawali APMC: शरद पवारांच्या विश्वासू नेत्याची भाजपसोबत हात मिळवणी; साताऱ्यात हालचालींना वेग

ते म्हणाले की, अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पदाची क्षमता आहे, ते अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, अनेक वर्ष मंत्री आहेत, तसेच चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे अनेकांना वाटत असतं मुख्यमंत्री व्हावं" एकनाथ शिंदे यांचं नाव नघेता म्हणाले की, अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोड फोड करून.

जर एखाद्याच्या भाग्यात योग असेल तर होत असत, अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची अनेक वेळा इच्छा बोलून दाखवली. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर संजय राऊतांनी दिली.

sanjay raut
Mumbai: सेक्स रॅकेट प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

अजित पवार काय म्हणाले होते.

सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखती दरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आलं की, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं, असंही ते म्हणाले.

अजित पवार यांनी दोन मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का, असा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, अस म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकली होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com