
संभाजीनगर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस हे सातत्यानं न्यायाची मागणी करत आहेत. त्यासाठी छोटा आका, मोठा आका अशा शब्दांमध्ये संशयित आरोपी वाल्मिक कराडं अन् मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्यानं हल्लाबोल चढवला आहे.
या घटनाक्रमाबाबत ते सातत्यानं माध्यमांना माहिती पुरवण्याचं काम करत आहेत. यापार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. तसंच या प्रकरणी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे अर्थात एसआयटीचे प्रमुख म्हणून सुरेश धस यांची नियुक्ती करा, असं हाके यांनी म्हटलं आहे.