अध्यक्ष व्हायचे असते तर सहा महिन्यापू्र्वीच झालो असतो : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले दिल्लीत आहेत. त्यांनी तेथे पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे पटोले यांची कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे.

कऱ्हाड : विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण तर प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करा, असा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना दिला आहे, अशी माहिती समजली आहे. मात्र मला अद्यापही पक्षातून कोणी काहीही विचारलेले नाही, असे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे आज (गुरुवार) स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष व्हायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीही होता आले असते, असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वास्तविक  दोन महिन्यांत आमदार चव्हाण यांनी खळबळ उडवणारे कॉग्रेस मधील एकमेव नेतृत्व म्हणून ओळखही निर्माण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा आहे. दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळात नेहमी कॉग्रेसच्या कुटूंबातील विचार कॅबिनेटमध्येही आमदार चव्हाण यांचा समावेश आहे. अशी स्थिती असतानाच अचानक त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. अध्यक्षपदाची चर्चा चालू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु पृथ्वीराज बाबांनी त्यांची भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही. त्यांची भुमिका नेहमी प्रमाणे गुलदस्त्यातच आहे. 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले दिल्लीत आहेत. त्यांनी तेथे पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे पटोले यांची कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत लॉबींग केले आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी माझे नाव दिले आहे. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण आणि कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना दिला आहे, असे समजते. मात्र त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही काहीही विचारणा झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी त्यावर काही मत व्यक्त करणार नाही. राहिला प्रश्न विधानसभा अध्यक्षपदाचा त्या पदावर जायचं असते तर सहा महिन्यापू्र्वीच ते पद घेता आले असते. 

तुम्ही केस, दाढी, फेशियल करण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचा

सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी 'या' साठी पुढाकार घ्यावा

या शहरात ३१ मे पर्यंत जनता कर्फ्यू, सर्व व्यवहार राहणार बंद

शाळा सुरू करताय? हा आहे धोका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Nana Patole Wish To Be Maharashtra Congress Leader Says Prithviraj Chavan