राज्याच्या क्रीडा विभागातील उपसंचालकासह जिल्हा, तालुका क्रीडाधिकाऱ्यांची बदली

सिद्धार्थ लाटकर
Monday, 24 August 2020

क्रीडा व युवक सेवाचे आयुक्त यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करावे असा आदेश शासनाने नुकताच दिला आहे.

सातारा : राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातील उपसंचालक, जिल्हा क्रीडाधिकारी तसेच तालुका क्रीडाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या आहेत. यामधील काही बदल्या रिक्त जागा झाल्याने, प्रशासकीय कारणास्तव झाल्या असून त्याबाबत नुकतेच शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

'फेक न्यूज' रोखण्यासाठी WhatsAppचं नवं भन्नाट फीचर; काय आहे पहा
 
क्रीडा व युवक सेवाचे आयुक्त यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करावे असा आदेश शासनाने नुकताच दिला आहे. क्रीडा विभागाच्या बदल्यांमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयातील अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख यांची लातूर विभागाच्या उपसंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे.

कोरोना रुग्णांसाठी 500 इंजेक्‍शन्स पुरविणार ; ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या संकल्पनेतून यांचा पुढाकार

भारीच की! सातारा जिल्ह्यात 60 कंपन्यांनी उभारले कोरोना केअर सेंटर
 
नगरच्या जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांची हिंगोली जिल्हा क्रीडाधिकारी, बुलढाणाचे जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील यांची नगरच्या जिल्हा क्रीडाधिकारी, धुळे जिल्ह्याचे क्रीडाधिकारी संजय सबनीस यांची बुलढाणा जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. इंदापूरचे (जि.पुणे) तालुका क्रीडाधिकारी सुहास व्हनमाने यांची सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुका क्रीडाधिकारी, आंबेगावचे (जि.पुणे) तालुका क्रीडाधिकारी सुभाष नावंदे यांची नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका क्रीडाधिकारी, माळशिरसचे (जि. सोलापूर) तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर यांची पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका क्रीडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या घामाच्या धारांनी भरला बंधारा ; गावकाऱ्यांनी ठोकला सलाम

करिना आणि सैफ घरातंच शूटींग करण्यात बिझी, करिनाने व्हिडिओमध्ये दाखवल्या पडद्यामागच्या गोष्टी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Transferes Of Sports Department From Maharashtra