
कोल्हापूर उत्तर: निवडणुकीसाठी सतेज पाटलांची 'फिल्डिंग', फडणवीसांना भेटणार
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची (Kolhapur North Assembly Election) पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज दिली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्या विकास निधीतून पूर्ण झालेल्या एक कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्धाटन आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमती जयश्री जाधव, संभाजी जाधव उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जाधव यांच्यावर कोल्हापूरकरांनी प्रेम केले, साथ दिली. तशीच साथ कोल्हापूरकर जयश्रीं जाधव यांनाही देतील, असा विश्वास आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता जेथे जेथे पोटनिवडणुका झाल्या, तेथे तेथे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलो आहे. कोल्हापूर उत्तरची जागा कॉंग्रेसची आहे. राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीचेच घटक पक्ष आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांनी आमच्या सोबतच यावे, अशी अपेक्षा असणार आहेत.
हेही वाचा: कोल्हापूर उत्तर निवडणूक : शिवसेना वाढवणार सतेज पाटलांचं टेन्शन?
तसेच कोल्हापूरच्या विकासाचे जाधव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना बिनविरोध संधी द्यावी, यासाठी देवेंन्द्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची वैयक्तिक भेट घेवून पोटनिवडणुकीत बिनशर्त पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार आहे. कोल्हापूरला पुरोगामी विचाराचा वारसा असून, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या विचाराची राजकीय संस्कृती आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांनी साथ दिली तर निश्चितपणे जयश्री जाधव सर्वांना विश्वासात घेऊन पुढच्या काळामध्ये काम करतील. सर्व नेते व कार्यकर्ते यांचे पाठबळ व आग्रह आणि कोल्हापूरच्या विकासाचे ‘आण्णां’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे जयश्री जाधव यांनी सांगितले.
Web Title: Satej Patil Visit In Devendra Fadnavis Chandrakant Patil Kolhapur North Assembly Election Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..