Abdul Sattar : एकनाथांचं अब्दुल सत्तार यांना आव्हान, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar

Abdul Sattar : एकनाथांचं अब्दुल सत्तार यांना आव्हान, म्हणाले...

मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटातील एका नेत्याकडूनच माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळं शिंदे गटातच अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं यानिमित्तानं समोर आलं आहे.

माझ्याविरोधात जी बातमी आली त्यावर मला शंका आली की मुख्यमंत्र्यांच्या घरात आमची जी चर्चा झाली ती बाहेर मीडियापर्यंत आली. मग मी मुख्यमंत्र्यांना याची तक्रार दिली की आपल्या चर्चेतील गोष्टी बाहेर कशा जातात? पण याबद्दल मी बोलणार नाही. पण तो नेता महाराष्ट्रातील आहे. माझ्यापेक्षाही विरोधकात माझे हितचिंतक अनेक आहेत. त्यामुळेही हे लोक जळत असतील असंही अब्दुल सत्तार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते त्यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: Delhi crime :''आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते'',मृत्यू झालेल्या तरुणीचे शब्द ठरले अखेरचे

एकनाथ खडसे बोलताना म्हणाले की, शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे. तर शिंदे गटातील कारस्थानी राजकरण्याचं नाव अब्दुल सत्तार यांनी जाहीर करावं असंही आव्हान खडसे यांनी दिलं आहे. शिंदे गटातील आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. तर हेच शिंदे गटातील कुरबुरीचं कारण असू शकतं असं खडसे म्हणालेत.

हेही वाचा: Sushant Singh Rajput: नितेश राणेंकडून सुशांतच्या मृतदेहाचा VIDEO ट्वीट; "बेबी पेंग्विन..."