Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा दुहरी भूमिका; म्हणाले "मी काँग्रेस सोडली नाही, पण..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satyajeet tambe

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा दुहरी भूमिका; म्हणाले "मी काँग्रेस सोडली नाही, पण..."

नाशिक - नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने मोठा वाद झाला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षातून सत्यजीत यांच्यासह त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना निलंबीत करण्यात आलं. आजअखेर सत्यजीत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्यांनी स्पष्ट केलेली भूमिका काँग्रेसला गोंधळात टाकणारी आहे. (Satyajeet Tambe news in Marathi)

सत्यजीत तांबे म्हणाले की, मी सुरुवातीपासून पक्षाकडे पद किंवा काही तरी जबाबदारी मागितली. मात्र मला पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितलं की तुम्ही वडिलांच्या जागी प्रयत्न करा. त्यानंतर कार्यकर्त्यांचा रेटा पाहून वडिलांनीच माघार घ्यायचं ठरवलं. त्यानुसार मी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला. यावेळी तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

सत्यजीत तांबे यांचा रोख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिसत आहे. तसेच ही माझी शेवटची पत्रकार परिषद असल्याचं सांगत त्यांनी मला माझ्या पक्षाला आणखी बदनाम करायचं नसल्याचं म्हटलं. आपण काँग्रेसमध्येच आहोत असंही त्यांनी सांगितलं. मात्र आपण अपक्ष निवडून आलो असून अपक्षच राहणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे सत्यजीत यांच्या दुहेरी भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले आहेत.