Satyajeet Tambe: सत्यजित तांबे काँग्रेसला रामराम ठोकणार? राजकीय घडामोडींना वेग

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरुन राज्यात राजकीय घडामोडींना वेग
tambe satyjit
tambe satyjit

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरुन राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे लवकरच पक्षाला राम राम ठोकणार असल्याच्या चर्चेला उत आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असतानाच आता तांबे यांनीच पक्षापासून फारकत घेण्याचे संकेत दिले आहेत.(Satyajeet Tambe social media profile change Congress not mentioned )

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी वेळेवर अर्ज न करता मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. त्यानंतर आता सत्यजीत तांबे यांच्याही निलंबनाचे संकेत देण्यात आहेत.

Marathwada University : दहा वाजता पेपर पण अद्याप हॉल तिकीट नाही; मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार

दरम्यान, त्यांनी सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल बदलले असून ट्विटर डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळं तांबे कॉँग्रेसला राम राम करणार हे स्पष्ट झाले आहे. अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

Sakal

तांबे घराने अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ट मानले जात होते. मात्र, पदवीधर निवडणुकीपासून नाशिकमध्ये राजकीय घडामोडी तीव्र झाल्या असून तांबे यांनी पक्षाचा आदेश न मानता सत्यजित तांबे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केल्याने कॉँग्रेसमध्ये फूट पडली आहे.

tambe satyjit
अर्जुन खोतकरांच्या जावयावर मोठी कारवाई; क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सत्यजीत तांबे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, सत्यजीत तांबे यांनी अर्ज मागे न घेतल्याने ते लढण्याच्या तयारीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com