Ajit Pawar Latest News : सयाजी शिंदे अजित पवारांच्या भेटीला; वृक्षसंवर्धनाआड येणाऱ्या रगेल अधिकाऱ्यांची तक्रार

sayaji shinde
sayaji shindesakal

Mumbai News : ज्येष्ठ अभिनेते तथा राज्यात वृक्षसंवर्धनाची चळवळ राबवून देवराई फुलवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

राज्य शासनाकडे वन विभागाची हजारो हेक्टर जमीन आहे. परंतु त्यात वृक्षसंवर्धन होत नाही. केवळ बोर्ड लावून जागा रिकामी पडून आहे. त्यामुळे त्या जागेत देवराई फुलवण्यासाठी मदत व्हावी, यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांची मंत्रालयात भेट घेतली.

sayaji shinde
Dilip Walse Patil: शरद पवारांवरील टीकेवर वळसे पाटलांचा यू-टर्न; स्पष्टीकरण देताना म्हणाले, 'मी खंत व्यक्त...'

यावेळी माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, आज अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीसांचीही भेट होणार होती. परंतु ते जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत आम्हाला कसलाही फायदा नकोय. बायोडायव्हर्सिटीचे केवळ बोर्ड लागलेले आहेत. त्यात आम्हांला पडायचं नाहीये. परंतु आम्ही जे करतो त्याला सपोर्टची गरज आहे.

sayaji shinde
धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

वनविभाग, महसूल विभागाचा सपोर्ट मिळतोय, परंतु काही अधिकारी या टेबलावरुन त्या टेबलावर करतात, त्यामुळे वेळ वाया जातो. त्यांचंही सहकार्य मिळावं, यासाठी अजित पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.(Latest Marathi News)

सयाजी शिंदे पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्याशी बोलताना एक नवीन संकल्पना मांडली. वृक्ष प्रसाद योजना, असं या उपक्रमाचं नाव आहे. आपण सिद्धीविनायक, महालक्ष्मी दर्शनाला जातो. त्यावेळी अभिनेषक करतो. तेव्हा जे झाड देवाला आवडतं ते भेट देण्यात येईल आणि त्याचं संवर्धन होईल. त्यामुळे हा उपक्रम सुरु करण्याची मागणी केल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com