
मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव, सुनावणी घेण्यास SC ची मंजुरी
मुंबई : दाऊद मनी लाँडरींगप्रकरणी (Dawood Money Laundring Case) नवाब मलिक (Nawab Malik) सध्या कोठडीत आहेत. कोठडीतून तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी करत मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली असून आता न्यायालय काय निर्णय देतंय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा: EDची नाशिकमध्ये छापेमारी? नवाब मलिक कनेक्शनची शक्यता
ईडी कारवाईपासून दिलासा मिळावा आणि कोठडीतून तातडीने सुटका व्हावी यासाठी नवाब मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर नवाब मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे.
गेल्या दीड महिन्यांपूर्वी नवाब मलिकांवर दाऊदच्या माणसांसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप झाला होता. त्यांनी गोवावाला कंपाऊंडमधील जमीन घेताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी ईडीने नवाब मलिकांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना ईडीने अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने देखील ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता मलिकांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. येत्या १८ एप्रिलपर्यंत मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. कोठडीतून सुटका होण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण, आता सर्वोच्च न्यायालय मलिकांना दिलासा देतेय की नाही? हे पाहणं महत्वाचं आहे.
Web Title: Sc Agrees To Hear Plea Of Nawab Malik In Dawood Money Lanudering Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..