कोरेगाव भीमा प्रकरण : आरोपी नवलखा, तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 मार्च 2020

कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. शेकडो लोकांचे गुन्हे मागे घेण्यात आले असले तरी ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे, अशा लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.६) या प्रकरणातील आरोपी आणि नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना दिलेल्या अटकेपासूनच्या संरक्षणाची मुदत १६ मार्चपर्यंत वाढविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नवलखा आणि तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर १६ मार्चला सुनावणी घेणार असल्याचे न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सांगितले.

- राज्यात पट्रोल-डिझेल महागणार; मुंबई, पुण्यात घरखरेदी स्वस्त

उपलब्ध पुरावे पाहता नवलखा आणि तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीला त्यांचा जामीनअर्ज नाकारला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी, यासाठी चार आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते. या संरक्षणात शुक्रवारी वाढ करण्यात आली. 

- #MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे...

दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी १९८४ वेळी काय परिस्थिती होती. तसेच त्यापूर्वी कोरेगाव भीमा परिसरात कुठली अनुचित घटना घडली होती का? या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांबद्दल अधिकाऱ्यांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे आणि महत्त्वाची बाब म्हणून त्या काळात केलेल्या दूरध्वनी संभाषणांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाला दिले आहेत.

- #HappyBirthdayJanhavi : ...त्यामुळे श्रीदेवीने मुलीचं नाव जान्हवी ठेवलं!

तसेच कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. शेकडो लोकांचे गुन्हे मागे घेण्यात आले असले तरी ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे, अशा लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत, अशी माहितीही गृहमंत्री देशमुख यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनावेळी दिली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC extends interim protection from arrest granted to Navlakha and Teltumbde in Bhima Koregaon case