Aaditya Thackeray : शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोटाळे सुरू ; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप!

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray esakal

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी आणि घोटाळे करत आहेत. राज्यात सगळीकडे हे सुरू आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले, जानेवारीमध्ये रस्त्याच्या घोटाळ्याचा मुद्दा मी मांडला होता. कुठलीही कमिटी, नगरसेवक, जनप्रतिनिधी नसताना ५ मोठे कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये पैसे देखील वाढवून देण्यात आले आहेत. मात्र अजून देखील ही कामे मुंबईत सुरू झाले नाही.  शिंदे सरकारकडून मुंबईत काँक्रीटच्या रस्त्यात घोटाळा झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने याबाबत तक्रार देखील केली आहे. गद्दार गँग सोडली तर कुणालाही विचारा कंत्राट काढले पण कामे सुरू झाली नाहीत. 

मेट्रो कारशेडच्या कामात मोठा घोटाळा! -

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेट आरेतून कांजूरमार्गला हलवण्यात आलं होतं. पण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठा घोटळा झाला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरेंनी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, "महसूल खात्याने कलेक्टरला सांगितले आहे की, मेट्रो ६ साठी आपण कांजूरमार्गच्या जागेपैकी १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करावी, आजची ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून मोठी आहे. यातून एकच सिद्ध होतं की, आम्ही गेल्या अडीच तीन वर्षे जे बोलत आलो आहोत की, मेट्रो ६ साठी कांजूरमार्गची कारशेड गरजेची आहे. या कारशेडसाठी २०१८ मध्ये टेंडर काढलं होतं, पण कारशेड बनवणार कुठं हा प्रश्नच होता. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरच्या कारशेडमध्ये लाईन ३, लाईन ६, लाईन १४ आणि लाईन ४ या चार लाईन्सचे कारडेपो आपण एकत्र करणार होतो. यामागे जनतेचे, महाराष्ट्राचे पेसै आणि वेळ वाचावा हाच हेतू होता"

Aaditya Thackeray
Stock Market Trading: 9 महिन्यांत 53 लाख गुंतवणूकदारांनी शेअर बाजार सोडला; काय आहे कारण?

मुख्यमंत्र्यांचे हितसंबंध

लाईन ४ आणि १४ याचा कारशेड ठाण्यात होणार यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांचे काय हितसंबंध आहेत ते पहावं लागेल. आमचं सरकार पाडल्यानंतर याबाबतची केस सुप्रीम कोर्टात बंद झाली आहे. त्यानंतर आता कांजूरमार्गमधील १५ हेक्टर जमीन नक्की कोणाची असणार हा प्रश्न निर्माण होतो. उर्वरित जागा मित्रांसाठी बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली आहे का? असे अनेक आरोप यावेळी आदित्य ठाकरेंनी केले आहेत.

Aaditya Thackeray
BJP News : कर्नाटकात धडाडणार देवेंद्र फडणवीसांची तोफ; भाजपची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com