अग्निशमन यंत्राविनाच स्कूल बस! आपत्कालीन दरवाजा बंद; बसमध्ये मुलांची दाटी

शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी शहरात ५२५ बसना आरटीओने परवानगी दिली आहे. त्या स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमनची दोन यंत्रे, आपत्कालीन दरवाजा, दप्तर ठेवायला स्वतंत्र स्टँड, गाडीतून उतरण्यासाठी पायरी असायला हवी. मात्र, सद्य:स्थितीत २०० हून अधिक स्कूल बसमध्ये ना अग्निशमन यंत्रे ना प्रथमोपचार किट आहे.
fire extinguisher expired
fire extinguisher expiredsakal

सोलापूर : शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी शहरात ५२५ बसना आरटीओने परवानगी दिली आहे. त्या स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमनची दोन यंत्रे, आपत्कालीन दरवाजा, दप्तर ठेवायला स्वतंत्र स्टँड, गाडीतून उतरण्यासाठी पायरी असायला हवी. मात्र, सद्य:स्थितीत २०० हून अधिक स्कूल बसमध्ये ना अग्निशमन यंत्रे ना प्रथमोपचार किट आहे.

विद्यार्थी वाहतूक करताना स्कूल बसला आग लागल्यास तत्काळ त्यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून प्रत्येक बसमध्ये अग्निशमनची दोन यंत्रे असणे बंधनकारक आहे. दुसरीकडे, किरकोळ आजारी किंवा अत्यावश्यक स्थितीत त्या बसमधील मुलाला प्रथमोपचार करता यावे म्हणून प्रथमोपचार किट असायला हवे. मात्र, काही स्कूल बसचालकांनी आरटीओकडून पासिंग करण्यापुरतेच तशा सुविधा असल्याचे दाखविले. तर काहींनी तशी यंत्रणा नसतानाही पासिंग करून घेतले, ही वस्तुस्थिती आहे. आरटीओ, वाहतूक पोलिस, शाळा व्यवस्थापन समिती अशा यंत्रणा असतानाही विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याने चिंता वाढली आहे. आठ वर्षांवरील वाहनांनी दोन वर्षांतून एकदा तर त्याहून जुन्या असलेल्या वाहनांनी दरवर्षी स्कूल बसचे पासिंग करून घेणे, फिटनेस (योग्यता) प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र, फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही आणि पासिंग केलेली नसतानाही स्कूल बस बिनधास्तपणे विद्यार्थी वाहतूक करतातच कशा, हा प्रश्न कायम आहे.

रिक्षांतून बिनधास्त विद्यार्थी वाहतूक

शाळा व्यवस्थापन समितीने परवानगी दिलेल्या खासगी स्कूल बसला विद्यार्थी वाहतूक करण्याची परवानगी आहे. दुसरीकडे, काही स्कूल बस शाळांच्या स्वत:च्या आहेत. त्याशिवाय कोणत्याही खासगी वाहनांना विद्यार्थी वाहतुकीची परवानगी नाही. मात्र, अनेक शाळांबाहेर दररोज शेकडो रिक्षांमधून दाटीवाटीने विद्यार्थी वाहतूक केली जाते. पण, त्याकडे ना शाळा व्यवस्थापन समिती ना आरटीओ ना वाहतूक पोलिसांकडून लक्ष दिले जाते. त्या रिक्षात अग्निशमन यंत्रणा सोडाच विद्यार्थ्यांचे दप्तर ठेवायलासुद्धा जागा नसते, हे विशेष.

संभाजी ब्रिगेडची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

योग्यता प्रमाणपत्र नसतानाही आणि पासिंग न करताच स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. त्यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकताच संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी त्यासंदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे तक्रार केली आहे. आता त्यांच्या आदेशाने सोलापूर शहरातील चिमुकल्यांच्या संदर्भात स्कूल बसचालकांकडून सुरू असलेला जीवघेणा खेळ थांबणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com