esakal | लसीकरण नसले तरी शाळेत या! शिक्षण आयुक्त सोळंकी यांचे शिक्षकांना आदेश | school update
sakal

बोलून बातमी शोधा

school teacher

लसीकरण नसले तरी शाळेत या! शिक्षण आयुक्त सोळंकी यांचे शिक्षकांना आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) ओसरल्याने आजपासून राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू (school start) होत आहेत. तत्पूर्वी शिक्षकांसह शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे (school employees) दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक (corona vaccination) केले होते. त्यावर काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे दोन्ही डोस झाले नसले, तरी कोरोनाचे नियम पाळत शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, असे सुधारित आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी (vishal solanki) यांनी दिले.

हेही वाचा: सलग चौथ्या दिवशीही मुंबईत इंधनाची दरवाढ; पेट्रोल 24 तर डिझेल 32 पैशांनी वाढले

कोरोनाच्या दोन्ही लशी पूर्ण न झाल्याचे कारण सांगून एकाही शिक्षकाला शाळेत गैरहजर राहता येणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती ही १०० टक्के ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय शिक्षक आणि शिक्षकेतरांनाही आरटीपीसीआरची सक्ती करू नयेही, असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

मुंबई परिसरातील शाळा दीड वर्षांनंतर सुरू होणार असल्या तरी वाहतुकीच्या मर्यादित पर्यायांमुळे किती विद्यार्थी शाळेत हजेरी लावतील यावर शंका असली तरीही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याचे आवाहन शाळांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी एका बाकावर एकच विद्यार्थी बसवला जाणार आहे. शाळेत ठराविक अंतरावर मार्गदर्शक खुणा करण्यात आल्या आहेत. अनेक शाळांच्या प्रवेशद्वारापाशी फूट सॅनिटायझर मशीन, थर्मल चेकिंगची सोयदेखील करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक शाळा नजीकच्या आरोग्य केंद्राशी अथवा खासगी रुग्णालयाशी जोडण्यात आली आहे. यासाठी लागणारा खर्च सीएसआरच्या निधीतून करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेण्यात येणारे निर्णय स्थानिक प्रशासन व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठरवण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.

हेही वाचा: पूर्व उपनगरात यंदा गरबा नाहीच; मुंबईत शंभर कोटींचे व्यवहार ठप्प

विद्यार्थ्यांसाठी

- ग्रामीण भागातील शाळांत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार
- प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क देण्यात येतील
- शाळांमध्ये सर्वच ठिकाणी एका बाकावर एक विद्यार्थी
- विद्यार्थी शिक्षक आदींची नियमित आरोग्य तपासणी
- शाळांमधून दुसरीकडे गेलेल्या स्थलांतरित मुलांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न
- शाळा सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षणही सुरू राहणार
- विद्यार्थ्यांवर सहामाही परीक्षेला हजर राहण्याची सक्ती नाही

शिक्षकांसाठी अशा आहेत नवीन सूचना


- लसीकरण झाले नाही या कारणास्तव गैरहजर राहता येणार नाही; १०० टक्के उपस्थिती सक्तीची
- लस घेतलेल्यांना आरटीपीसीआरची सक्ती नाही
- शिक्षकांनी शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित
- पहिल्या आठवड्यानंतर हळूहळू शालेय कामकाजाचे तास वाढवण्याची गरज
- मागील काळात बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी उपचारात्मक अभ्यास पद्धती राबवणे
- प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या वागणुकीची नोंद ठेवणे.

loading image
go to top