

Seaweed Farming
ESakal
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर सुरू करण्यात आलेल्या समुद्र शैवाल (सीवीड) शेतीमुळे स्थानिक मच्छीमार कुटुंबांना नव्या उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स कंपनी डीपी वर्ल्डच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, रायगड किनारपट्टीवर आतापर्यंत २५० हून अधिक समुद्र शैवाल लागवड युनिट्स उभारण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे मच्छीमार कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्याबरोबरच महिला बचत गटांचाही या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे.