शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ‘एप्रिल-मे’मध्ये! सध्याच्या भरतीसाठी प्राधान्यक्रम भरायला फेब्रुवारीत सुरवात; झेडपी व माध्यमिकमध्ये २२००० पदभरती

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येवू नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये १३ हजार तर खासगी माध्यमिक शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत.
schools
schoolssakal

सोलापूर : शिक्षक भरतीसाठी सर्वच जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकेच्या शाळांनी शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’वर अपलोड केल्या आहेत. दुसरीकडे माध्यमिक शाळांनीही त्यांच्याकडील रिक्त पदे पवित्र पोर्टलवर कळविली आहे. आता त्याची पडताळणी होऊन फेब्रुवारीच्या सुरवातीलाच नोंदणीकृत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे सध्या शिक्षक भरतीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येवू नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये १३ हजार तर खासगी माध्यमिक शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत.

पवित्र पोर्टलवर ज्या ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरवात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण रिक्त पदांच्या ७० टक्के पदभरती होणार आहे. त्यातही प्रत्येक केंद्र शाळेच्या ठिकाणी एक इंग्रजी शिक्षक नेमला जाणार आहे. सध्या ‘पवित्र’वर अपलोड झालेल्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांमधील १७ हजार जागांपैकी चार ते साडेचार हजारांपर्यंत इंग्रजीचेच शिक्षक असतील.

माध्यमिक शाळांच्या जाहिरातीची मुदत संपली

राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपुष्टात आली असून ज्या शाळांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतलेली नाही आणि २०२२-२३मधील संच मान्यता अपूर्ण आहे, त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. ज्या शाळांनी ‘पवित्र’वर दोन-चार दिवसांपूर्वी नोंदणी केली होती, त्यांना उद्यापर्यंत (बुधवार) जाहिरात अपलोड करण्यास संधी आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण ६० शाळांनी अंदाजे २२५ शिक्षकांच्या जाहिराती ‘पवित्र’वर अपलोड केल्या आहेत. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी दिली जाणार आहे.

एप्रिलनंतर भरतीचा दुसरा टप्पा

सध्या सुरू असलेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपविली जाणार आहे. त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल-मे महिन्यात राबविला जाणार आहे. तत्पूर्वी, टीईटी होईल आणि त्यानंतर टेट होऊन दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला प्रारंभ होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com