esakal | कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर; दुपटीने वाढली संख्या

बोलून बातमी शोधा

null

कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर; दुपटीने वाढली संख्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक किती भयंकर आहे हे गेल्या वर्षीच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीच्या तुलना केली असता समोर आले आहे. गेल्या वर्षी देशात १७ सप्टेंबरला या एका दिवसात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या १० लाख १७ हजार ७०५ होती. ती १८ मार्च २०२१ रोजी १९ लाख २३ हजारांपेक्षाही जास्त झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पुण्यासह देशात गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट उद्रेक झाला आहे. त्यामुळे ही दुसरी लाट अधिक गंभीर असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरबाबत उच्च न्यायालयाची नाराजी; राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या जानेवारीत केरळमध्ये आढळला. मार्चनंतर मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून लागले. मात्र, पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये होती. त्यानंतर देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत गेली. पण, फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रासह देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याची नोंद केंद्रीय आरोग्य खात्याने केली आहे. कोरोनाच्या उद्रेकाच्या दुसऱ्या लाटेचा वेग इतका भयंकर आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुसऱ्या लाटेत दुप्पट रुग्णांना संसर्ग होत असल्याचे दिसते.

हेही वाचा: CBSE नंतर ICSEने दहावीच्या परीक्षा केल्या रद्द

अशी वाढली राज्यात लाट

- राज्यात पहिल्या लाटेत १७ सप्टेंबरला एका दिवसात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

- ही संख्या तीन लाख एक हजार ७५२ होती.

- राज्यात फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची आणि पर्यायाने त्याच्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली होती.

- राज्यात ११ फेब्रुवारीला ३० हजार २६५ पर्यंत कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले.

- फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे.

- सध्या राज्यात गेल्या वर्षीच्या दुप्पट म्हणजे ६ लाख ७० हजार ३८८ रुग्ण आहेत.

हेही वाचा: Corona Vaccine: आत्ताच लस मिळत नाहीये, 1 मे नंतर काय होईल !

पुणे जिल्ह्यातील उद्रेक

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर १६ सप्टेंबरपर्यंत दर दिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली आहे. गेल्या वर्षी पुण्यातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण १६ सप्टेंबरला ८२ हजार १७२ होते. यंदा पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आतापर्यंत एक लाख २२ हजार ४८६ पर्यंत वाढली आहे.

मृत्यूदर सर्वांत कमी

कोरोनाच्या उद्रेक दुप्पट वेगाने होत असला तरीही त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची प्रमाण कमी होत आहे. गेल्या वर्षी ११ एप्रिलला मृत्यूदर ११.२ टक्के होता. तो आता १.६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश आले आहे.