esakal | Lockdown : बँकिंग संदर्भात पोलिसांकडून स्वतंत्र नियमावली जाहीर!
sakal

बोलून बातमी शोधा

Banking

- उपलब्ध मनुष्यबळाच्या चाळीस टक्के कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकतील.

Lockdown : बँकिंग संदर्भात पोलिसांकडून स्वतंत्र नियमावली जाहीर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील बहुतांश भागात काही कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने पुणे पोलिसांनी मंगळवारी संक्रमण क्षेत्राची व्याप्ती वाढवून तेथे कडक संचारबंदी लागू केली. दरम्यान, या भागातील बँकिंग व्यवस्था सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र नियमावली लागू केली आहे. याबाबतचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी बुधवारी (ता.१५) दिला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मंगळवारी खडक, हडपसर, विमानतळ, चंदन नगर, विश्रांतवाडी, सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे, कोथरुड व बंडगार्डन या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही विशिष्ठ भागात नागरिकांना संचार करण्यास मनाई (कर्फ्यु) करीत कडक संचारबंदी लागू करण्याचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिला होता.

- चक दे इंडिया! सतत विरोधी भूमिका घेणाऱ्या देशांना औषधे पुरवतोय भारत!

दरम्यान, या भागातील बँकिंग व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बँकांच्या कामकाज पद्धतीत बदल सुचविणारी स्वतंत्र नियमावली डॉ.शिसवे यांनी जाहीर केली. 

अशी असेल बँकांसाठी नियमावली :

- कोरोना प्रतिबंधित परिसरातील सर्व बँका बंद राहतील, मात्र सर्व बँकाचे एटीएम केंद्र पूर्णपणे कार्यान्वित असतील.

- अत्यावश्यक आर्थिक सेवा व शासकीय अनुदानाच्या वितरण संबंधित बँकांच्या शाखा विहित काळात चालू ठेवता येतील.

- Digital Exclusive : धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..!

- त्यासाठी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांनी समन्वय साधून अशा बँका व त्यांच्या शाखा निश्चित कराव्यात.

- सदर बँकांच्या ग्राहकांसाठी सकाळ 10 ते दुपारी एक पर्यंत तसेच अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी दुपारी एक ते चार पर्यंत चालू ठेवता येईल.

- उपलब्ध मनुष्यबळाच्या चाळीस टक्के कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकतील.

- बँक प्रशासनाने कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या आदेशाची प्रत द्यावी.

- मालवाहू वाहनांच्या परवानगीसाठी 24 तास सुविधा; परिवहन आयुक्त कार्यालयाचा खुलासा

- संक्रमण क्षेत्रातील मनाई आदेशांतर्गत कर्तव्यावर हजर राहणारे अधिकारी-कर्मचारी हे शक्यतो त्याच क्षेत्रातील वास्तव्यास असणारे असावेत.

- बँक परिसरात ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी बँकांनी खाजगी व मान्यताप्राप्त सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी.