

Maharashtra Politics congress
esakal
BJP leaders join Congress : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षविस्ताराला वेग दिला असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री वामनराव नाईक यांच्या नात गितांजली नाईक यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.