Vidhan Sabha 2019 : शहा-ठाकरे भेट रद्द? युती तुटण्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (रविवार) भेट होणार नाही, अशी चर्चा जोर धरत आहे. शहा-ठाकरे भेट रद्द झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. 

मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (रविवार) भेट होणार नाही, अशी चर्चा जोर धरत आहे. शहा-ठाकरे भेट रद्द झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. अमित शाह 'मातोश्री'वर जाणार नसल्याने युती होणार की नाही, याबाबत सध्या साशंकता निर्माण झाली आहे. 

अमित शाह उद्या (रविवार) 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. या भेटीनंतर युती जाहीर केली जाणार होती. मात्र, आता या दोन्ही नेत्यांची भेटच रद्द झाल्याने शिवसेना काय निर्णय घेणार? युती होणार की नाही?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की नाही यावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. पण, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. निकालानंतर सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येत असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतही युतीबद्दल ठोस उत्तर दिले नाही. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र युती होईलच, असा विश्वास व्यक्त करत आहेत.

आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे 'राहुल गांधी', टीव्ही अँकरची जीभ घसरली (व्हिडिओ)

युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेतली, असे दोन्ही पक्षांकडून सातत्याने सांगितले जात होते. पण, भाजपच्या अंतर्गत गोटात शिवसेनेशिवाय १६०पर्यंत जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच शिवसेनेशिवाय निवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून धरला जात आहे. स्वतंत्र निवडणूक लढवायची आणि गरज पडलीच तर, शिवसेनेला पुन्हा सत्तेत घ्यायचे, अशी रणनिती भाजपकडून अवलंबली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

"शशी थरूर म्हणतात,...म्हणून मी हिंदू आहे

काय आहेत मतभेद?

- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध 
- नाणार आणि आरे येथील मेट्रोशेडला शिवसेनेने विरोध करण्यावर भाजपमध्ये नाराजी 
- शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे करण्याला भाजपमधून दबक्या आवाजात विरोध
- राम मंदिराचा मुद्दा सातत्याने उपस्थित केल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सभेत टोचले शिवसेनेचे कान
- दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा मुद्दा सर्वांत मोठा, जास्तीत जास्त जागा मिळवण्याची शिवसेनेला अपेक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Thackeray meeting may canceled Shivsena BJP Alliance may not be Continue