
Shahajibapu Patil 'राष्ट्रवादीचे १२ आमदार फुटलेत, फक्त....' शहाजी पाटील यांचं मोठं वक्तव्य
Shahajibapu Patil: काय झाडी, काय डोंगार, काय ते हाटील...एकदम ओक्के....असं सांगत आमदार शहाजीबापू पाटील यांनी वेगळाच दणका उडवून दिला होता. ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यांच्या मुलाखती सुरु झाल्या. गुवाहाटीमध्ये केलेल्या वक्तव्याचा परिणाम असा की, शहाजीबापू यांच्या अनेक प्रतिक्रियांची जोरदार चर्चा सुरु झाली. आताही त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
शहाजीबापू पाटील यांनी आता थेट राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. एका मराठी न्युज वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये काय बदल होणार आहेत याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे
राष्ट्रवादीचे बारा आमदार आमच्या संपर्कात असून एक मोठा राजकीय भुकंप असल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले सगळं ठरलं आहे फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे.
याशिवाय पाटील यांनी सोलापूर जिल्हयातील आणखी एक बडा नेता देखील आमच्याकडे येणार आहे. त्यामुळे पुन्हा एक मोठा दणका बसणार आहे. असे पाटील यांनी सांगितल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील आमदार पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा कोणताही आमदार फुटलेला नाही. असा कोणताही विषय नाही. आमच्या पक्षाबाबत वेगवेगळ्या अफवा पसवरल्या जात आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करत असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.