
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातलं वातावरण तापलं असताना आता एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडलीय. शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी चार चाकी गाडी फोडून त्यांना बेदम मारहाण केली आहे. यात माजी सरपंचांचे दोन्ही पाय तुटले आहेत. त्यांना उपचारासाठी शहापूरमधून ठाण्याला हलवण्यात आले.