शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Shakti Cyclone : अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ घोंगावत असून किनारपट्टीला येईपर्यंत त्याची तीव्रता कमी होईल. मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला या चक्रीवादळाचा धोका नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय.
Shakti Cyclone Update Maharashtra Coast Safe But Interior Regions May Get Heavy Showers

Shakti Cyclone Update Maharashtra Coast Safe But Interior Regions May Get Heavy Showers

Esakal

Updated on

अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ निर्माण झालंय. सध्या या चक्रीवादळामुळे समुद्रात खोलवर १०० किमी प्रतितास वेगानं वारे वाहतायत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केलंय. अरबी समुद्रात हे चक्रीवादळ गुजरातमध्ये द्वारकेच्या दिशेनं सरकत आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीला धोका नसल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय. किनारपट्टीला येईपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल आणि ते पुन्हा ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com