

Bawankule on Shaktipeeth Highway
esakal
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीचे काम सध्या सांगली जिल्ह्यात सुरू झालं आहे. याआधी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात मोजणी सुरू झालीय. तर विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मोजणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, या महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. याबाबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आले असता महामार्गाला राजकीय लोकांकडून विरोध केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूरमध्ये बोलताना त्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत सद्यस्थिती आणि होणाऱ्या विरोधाबाबत प्रश्न विचारला होता.