Shambhuraj Desai : साधं मंत्रालयात येता आलं नाही, मग गद्दार कोण? देसाईंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray

महाविकास आघाडी सरकारमुळं ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून शिवसेना बाजूला झाली आहे.

Shambhuraj Desai : साधं मंत्रालयात येता आलं नाही, मग गद्दार कोण? देसाईंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

अहमदनगर : शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का देत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळं शिंदे गटावर गद्दार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, गद्दार कोण असा सवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट विरुध्द ठाकरे गट आमने-सामने आहेत. त्यातच आता शंभूराज देसाईंनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष केलंय. ज्यांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराला विरोध केला, त्यांच्याबरोबर सरकारमध्ये बसलं. त्यांच्याबरोबर सरकार करणं याला प्रतारणा म्हणायची का? याला काय शब्द वापरायचा, त्यामुळं त्यांनी आता ह्याचा विचार केला पाहिजे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर केली आहे.

हेही वाचा: आमचा एकही आमदार नाराज नाही, उलट राष्ट्रवादीची मंडळी शिंदे गटाच्या संपर्कात; देसाईंचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीमुळं शिवसेनेचं नुकसान

आम्ही कुणीही शिवसेना सोडलेली नाही. आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमुळं ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून शिवसेना बाजूला झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) बरोबरच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे नुकसान होतं, शिवसैनिकांचा नुकसान होतं. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचं नुकसान होत असल्यामुळं हा निर्णय घेतल्याचं देसाईंनी सांगितलं. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात, तेंव्हा तुम्ही साधं मंत्रालयात येत नव्हता, असं म्हणत शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून सामनातून टीका करण्यात आली होती, त्यावर शंभूराज देसाई बोलत होते.

हेही वाचा: Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; आता रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार

Web Title: Shambhuraj Desai Criticism Of Uddhav Thackeray At Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..