
Shani Shingnapur Row: अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थाननं नुकत्याच १६७ लोकांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकलं, यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांना कामावरुन काढून टाकल्यानं आता हा वादाचा मुद्दा बनला आहे. हा मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार असल्याचं माजी आमदार वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ कोटी जनतेला रोजगार देण्याचं म्हटलं होतं पण दुसरीकडं धर्माच्या नावावर लोकांना बेरोजगार केलं जातंय असंही त्यांनी म्हटलं आहे.