
आईची प्रकृती बिघडली होती आणि तिच्यावर नुकतीच सर्जरी झाली होती. आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जावेद, त्याची पत्नी आणि दोन मुलांसह ब्रिटनहून आला होता. आईला भेटला, कुटुंबासोबत ईद साजरी केली आणि ब्रिटनला परतत होता. अहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानात चौघांचाही मृत्यू झाला. जावेदच्या भावाने सांगितलं की, मुंबईत तिकिट न मिळाल्यानं त्यांनी अहमदाबादहून विमान पकडलं होतं.