
काल बैठक झाल्यानंतर काही गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे होते. आज सकाळी सात वाजता एका सहकाऱ्याने कळविले आम्हाला येथे आणण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता राज्यपाल सर्व कामे सोडून तयार आहेत, याचे आश्चर्य वाटते. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही सदस्य त्याठिकाणी गेल्याचे कळाले. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे कळाले.''
मुंबई : आमच्या सर्वांचे ठरले आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. त्यांना 30 नोव्हेंबरला विधीमंडळात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार
अजित पवारांच्या निर्णय राष्ट्रवादीच्या धोरणांच्या विरोधात आहेत. राष्ट्रवादीचा एकही नेता त्यांच्यासोबत राहणार नाही. जे सदस्य गेले त्यांना पूर्वीपासून माहिती होती. जे जाणार असतील त्यांनी लक्षात ठेवावे पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व जाऊ शकते. महाराष्ट्राचा जनमानस भाजपविरोधात आहे. त्यामुळे जनमताविरोधात जाऊन निर्णय घेणार असेल तर त्यांचा मतदारसंघातील मतदार त्यांच्यासोबत राहणार नाही. पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र मिळून त्या उमेदवाराचा पराभव केला जाईल. आमचे 10 ते 11 सदस्य त्यात सहभागी झाले होते. त्यातील सहा सदस्यांची माहिती मिळाली आहे. त्यानंतर एक-एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरवात केला आहे. राजेंद्र शिंगणे यांची राजभवनातून सुटका झाल्यानंतर त्यांना परत आणण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
Sharad Pawar, NCP Chief at NCP-Shiv Sena press conference in Mumbai: All the MLAs who are going must know that there is an anti defection law and the possibility of them losing their assembly membership is high. pic.twitter.com/8YrdIkCn2x
— ANI (@ANI) November 23, 2019
शरद पवार म्हणाले, ''महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तिन्ही पक्षांची तयारी झाली होती. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा या तिन्ही पक्षांकडे होते. पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणे निवडून आलेले सदस्य शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 46 असे 156 सदस्यांसोबत काही अपक्षांसोबत ही संख्या 170 च्या आसपास जात होती. काल बैठक झाल्यानंतर काही गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे होते. आज सकाळी सात वाजता एका सहकाऱ्याने कळविले आम्हाला येथे आणण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता राज्यपाल सर्व कामे सोडून तयार आहेत, याचे आश्चर्य वाटते. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही सदस्य त्याठिकाणी गेल्याचे कळाले. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे कळाले.''
पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.