Sharad Pawar : पवारांची चाल फडणवीसांना शेवटपर्यत कळलीच नाही! पवारांनीच सांगून टाकलं...

पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पहाटेच्या शपथविधीविषयी विचारणा केली. त्यावेळी पवारांनी वेगवेगळे खुलासे केले आहे.
Sharad Pawar attack Devendra Fadanavis Ajit pawar
Sharad Pawar attack Devendra Fadanavis Ajit pawar esakal

Sharad Pawar attack Devendra Fadanavis Ajit pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील पहाटेचा तो शपथविधी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आला आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चाही झाली आहे. उलट सुलट प्रतिक्रियाही समोर आल्या आहे. अशावेळी त्या शपथविधीमागील मास्टर माईंड कोण असा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडला होता. त्यावर आता वेगळीच माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मोठ्या कोड्यात टाकले आहे. फडणवीसांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पवारांवर जे आरोप केले होते त्याला पवारांनी जशास तसे उत्तर दिले आहे. काही तासांपासून फडणवीस यांची ती मुलाखत खूपच व्हायरल झाली होती. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चाही सुरु होती.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पहाटेच्या शपथविधीविषयी विचारणा केली. त्यावेळी पवारांनी वेगवेगळे खुलासे केले आहे. पवार म्हणाले, माझा काही त्या शपथविधीला पाठींबा नव्हता. मी तो पाठींबा का देईल. बाहेरून पाठींबा द्यायचा ठरले असताना आम्ही पहाटेच्या शपथविधीचा विचार काही केला नव्हता. आता मात्र त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पवार पुढे म्हणाले, मी फसवलं तर देवेंद्र फडणवीस का फसले. मी म्हणेल राज्यपाल व्हा तर ते येतील का? आमच्यात बैठका झाल्या. हा राजकीय डाव होता की डबल गेम होता याचा अर्थ तुम्हाला काय काढायचा तो काढा. मला बैठकीच्या पुढील दोन दिवसांचे काही माहित नाही. पवारांच्या या वक्तव्यानं आता पुन्हा वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यावरुन पुन्हा एकदा पहाटेचा तो शपथविधी चर्चेत आला आहे.

Sharad Pawar attack Devendra Fadanavis Ajit pawar
Sharad Pawar: "पवारांनी आमचा वापर केला, रणनीती आखली अन्… शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी माघार घेतली"

पवारांनी त्या शपथविधी सांगितले की, मी जर निर्णय बदलला तर मग फडणवीसांनी शपथ का घेतली, आणि त्यांना जर शपथ घ्यायचीच होती तर ती एवढी चोरून का घेतली. पहाटेच का घेतली. सरकार बनविण्यासाठी बाहेरून पाठींबा द्यायचा असे आमचे ठरले होते. सरकार स्थापन करण्याबाबत आमची चर्चाही झाली होती. असे पवार यांनी यावेळी सांगितले. पवारांच्या या वक्तव्यावर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

Sharad Pawar attack Devendra Fadanavis Ajit pawar
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवरुन राष्ट्रवादीला टार्गेट करणाऱ्या PM मोदींना पवारांचं उत्तर; म्हणाले, हे खरंय...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com