Sharad Pawar: विधानसभा, लोकसभा महाविकास आघाडी म्हणून लढवणार का? शरद पवारांचं मोठ विधान

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानं आगामी निवडणुकांची चर्चा सुरु झाली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSakal

मुंबई : राज्यातील आगामी २०२४ ची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार का? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा यांनी शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Sharad Pawar big statement about contest Vidhan Sabha Lok Sabha contest as Mahavikas Aghadi)

शरद पवार म्हणाले, "राज्यातील लोकांना बदल हवा आहे, त्यामुळं निवडणूक महाविकास आघाडी आगामी विधानसभा आणि लोकसभा एकत्र लढवेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत"

Sharad Pawar
Bacchu Kadu : रंगपंचमीनिमित्त बच्चू कडूंनी मांडली सामाजभान जपणारी कल्पना; कार्यकर्त्यांना दिल्या सूचना

कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. पण या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल याची खात्री खुद्द पवारांना नव्हती. "कसब्यात यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि शनिवार पेठ हा भाजपचा गड आहे.

त्यामुळं कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती, हे मुख्य कारण आहे. कसब्यात गिरीष बापट यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केलं होतं. ते लोकांमध्ये असायचे भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असं वाटत होतं," असंही शरद पवार म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com