
Sharad Pawar : शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, दिलासा देत म्हणाले...
शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मोठे विधान केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिन्हाच्या वादात आता पडणार नाही, असे पवार म्हणाले होते. यापूर्वी देखील शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ही चर्चा झाल्याची चर्चा आहे. यावेळी आगामी कायदेशीर लढ्यासंदर्भात देखील पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केल्याची माहिती आहे.
सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे राजकारणात तणावाचे वातावरण आहे. कायदेशीर घडामोळी देखील राज्यात घडत आहेत.
महाविकास आघाडी तुमच्या पाठीमागे पुर्णपणे उभी आहे, असा दिलासा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीसाठी धोकादायक असून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचा निर्णय सत्य आणि जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे.