Sharad Pawar | पवारांना जीवे मारण्याची धमकी देणारा उच्चशिक्षित विद्यार्थी; नेटकरी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
पवारांना जीवे मारण्याची धमकी देणारा उच्चशिक्षित विद्यार्थी; नेटकरी चिंतेत

पवारांना जीवे मारण्याची धमकी देणारा उच्चशिक्षित विद्यार्थी; नेटकरी चिंतेत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअऱ करत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या तरुणाच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे.

काय आहे प्रकरण?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये निखिल भामरे नावाचा एक तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करून केलेलं आक्षेपार्ह ट्विट होतं. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, "वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग." या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'त्या' विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा, पोस्टवर आव्हाड संतापले

कोण आहे निखिल भामरे?

निखिल भामरे हा मूळचा सटाण्याचा आहे. तो सध्या दिंडोरी तालुक्यातील वरवंडी इथं बी फार्मसीचं शिक्षण घेत आहे. भामरे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने शरद पवारांविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण दिंडोरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तो बागलाणकर या नावाने आक्षेपार्ह ट्विट करत होता.

हेही वाचा: केतकी चितळे पुन्हा बरळली; शरद पवारांविषयी केली आक्षेपार्ह पोस्ट

राजकारण्यांसाठी विद्यार्थ्यांनी केसेस अंगावर घेऊ नयेत

हा विद्यार्थी अशा प्रकारचे ट्विट केल्याने अडचणीत सापडल्याचं समजताच नेटकऱ्यांमधून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकारण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगावर केसेस घेऊ नयेत, असा सूर सोशल मीडियावरून उमटत आहे.

Web Title: Sharad Pawar Death Threat Nikhil Bhamre Tweet Police Arrested Student

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad Pawar
go to top