Vidhan Sabha 2019 : शरद पवार म्हणाले, मुलाबाळांची लग्न करायची म्हणून...

टीम ई-सकाळ
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता पवार कुटुंबियांमध्ये त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी चर्चा झाल्याचे खुद्द शरद पवार यांनी सांगितले. 

अजित पवार यांनी काल (शुक्रवार) आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो लगेचच स्वीकारलाही. त्यानंतर राज्यात खऱ्या राजकीय नाट्याला सुरवात झाली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मात्र, त्यानंतरही अजित पवार यांच्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही.

उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावं : शरद पवार

तसेच अजित पवार गेल्या 16 तासांपासून 'नॉट रिचेबल' असल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता आज सकाळपासून अजित पवार काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 'सिल्व्हर ओक'मध्ये पवार कुटुंबियांशिवाय इतर कोणतीही व्यक्ती नव्हती. तरीदेखील या बैठकीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. त्यानंतर आता मात्र, अजित पवार यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा या बैठकीत झाल्याचे सांगितले जात आहे.  

...म्हणून अजित पवारांनी दिला राजीनामा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar gives reason of Meeting With Pawar Family Maharashtra Vidhan Sabha 2019