
शरद पवार मोदींचे गुरू; ते त्यांच्या सल्ल्यानुसार काम करतात - संजय राऊत
शरद पवार यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ले द्यावेत, असं विधान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. पवारांनी देशाची चिंता करू नये, जनता मोदींवर खूश आहे, असंही फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, तसंच उत्तर प्रदेश सरकारचं मुंबई कार्यालय या विविध विषयांवर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. (Sanjay Raut Statement on Sharad Pawar and Modi)
हेही वाचा: शरद पवारांनी आता उद्धव ठाकरेंना सल्ले द्यावे; फडणवीसांचा सल्ला
शरद पवारांनी राज्यात लक्ष द्यावं आणि त्यांचे बहुमूल्य सल्ले उद्धव ठाकरेंना द्यावेत, या फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, "अगदी बरोबर! नरेंद्र मोदींनीसुद्धा सांगितलं आहे की शरद पवार त्यांचे गुरु आहेत, त्यांचा ते सल्ला घेतात, सल्ल्यानुसार काम करतात. शरद पवार मुख्यमंत्रीच नव्हे देशातल्या अनेक प्रमुख नेत्यांना ते सल्ले देतात. राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे.
हेही वाचा: मुंबईत योगी सरकारचं कार्यालय; राज ठाकरेंच्या भूमिकेचे पडसाद?
अयोध्येत महाराष्ट्राचं कार्यालय उघडणार - संजय राऊत
मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणतात, त्यावर सरकार उत्तर देईल. कोणत्या जागेवर कार्यालय उभं करणार. मला वाटतं, मुंबई, नवी मुंबईत अनेक राज्यांची कार्यालयं आहेत. देश एक आहे असं आपण म्हणतो, तेव्हा आम्ही कोणत्याही राज्यात जाऊ येऊ शकतो. आम्हीही अयोध्येत जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी एक सेंटर उभं करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केलीये. आम्हीही लखनौला करू, वाराणसीला करू. हा सरकार टू सरकार प्रश्न आहे.
हेही वाचा: सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाहीत; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र; त्यावर संजय राऊत म्हणतात...
मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. अशी अनेक पत्रं मुख्यमंत्र्यांना येत असतात, त्यात काही नवीन नाही.
हेही वाचा: NSEL घोटाळ्यात चौकशी झालेल्या कंपनीकडून सोमय्यांना पैसे : संजय राऊत
किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
नॅशनल स्पॉट एक्सचेंजमध्ये ५६०० कोटी रुपयांचा घोटाळा २०१३ मध्ये उघडकीस आला होता. यामध्ये तब्बल १३ हजार गुंतवणूकदारांचे पैसे अडकले होते. या घोटाळ्यात ज्या कंपनीची चौकशी झाली त्याच कंपनीकडून किरीट सोमय्यांना लाखो रुपये मिळाल्याचा नवीन आरोप संजय राऊतांनीकेला आहे.
Web Title: Sharad Pawar Is Guide Of Narendra Modi He Works By His Advice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..