Sharad Pawar: शरद पवारांनी लिहिले शिंदेंना पत्र, वाचा त्यात नक्की म्हटले आहे तरी काय?

Ekanth Shinde : मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
Sharad Pawar: शरद पवारांनी लिहिले शिंदेंना पत्र, वाचा त्यात नक्की म्हटले आहे तरी काय?
Updated on

Latest Mumbai News: ‘‘राज्यात ३२ लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अहोरात्र अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांची भरतीप्रक्रिया वेळेवर व्हावी तसेच वेळेवर नियुक्त्या मिळाव्यात, हीच एकमात्र अपेक्षा असते.

परंतु सद्यःस्थितीत रखडलेल्या नियुक्त्या, अनेक परीक्षांच्या प्रलंबित असलेल्या जाहिराती, परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यास होत असलेला विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे या प्रश्नावर बैठकीसाठी वेळ मिळावी,’’ अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com