Sharad Pawar Narendra Modi Friendship : मोदींसोबत शरद पवारांची मैत्री कधी झाली ? पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच..

शरद पवारांची आणि नरेंद्र मोदी यांची मैत्री ही कॉंग्रेस व इतर मित्रपक्षांसाठी चिंतेची बाब ठरलेली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

Narendra Modi Pune Visit :  पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ते स्वीकारणार आहेत. हा पुरस्कार त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून शिंदे सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर शरद पवार हे भाजप सोबत जाण्याची चर्चा सुरू झाली.

राजकीय विरोधक असले तरी शरद पवार आणि मोदी यांची मैत्री अनेक वर्षांपासून कायम आहे. टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती लावण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांनी मोदींच्या स्वागताला हजर राहण्याचा घेतलेला निर्णय हा दोघांच्या मैत्रीचा दाखला असल्याचं बोलल जात आहे.

(Friendship day)

मोदींसोबत मैत्री कधी पासून सुरू झाली याबद्दल शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्रात सविस्तर सांगितलं आहे. नुकताच या आत्मचरित्राचा पुर्नप्रकाशनाचा कार्यक्रम झाला यात पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीच्या सत्ताविसर्जनापर्यंत अनेक वादग्रस्त गोष्टींचा खुलासा करण्यात आलाहोता .

शरद पवारांच्या राजकीय खेळीबद्दल कायमच अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः त्यांची व नरेंद्र मोदी यांची मैत्री ही कॉंग्रेस व इतर मित्रपक्षांसाठी चिंतेची बाब ठरलेली आहे. राष्ट्रवादी व भाजप यांच्यात आघाडी होण्याची शक्यता कायमच बोलली जाते. मात्र तरीही शरद पवार याचा कायम नकार देतात. त्यांनी या मैत्रीबद्दल देखील आपल्या आत्मचरित्रात खुलासा केला आहे.

(Sharad Pawar Lok Maze Sangati Autobiography exposed pm Narendra Modi and Sharad Pawar friendship)

२००२ साली झालेल्या गुजरात दंगली नंतर नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीयस्तरावरील प्रतिमा डागाळली होती. विरोधक त्यांच्यावर चारही बाजूनी हल्लाबोल करत होते. विशेषतः २००४ साली डॉ. मनमोहन सिंग यांच संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर मोदींच्या अडचणी वाढल्या.

शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री घटनात्मक प्रमुख असूनही काँग्रेस नेतृत्वाबरोबर त्यांच्या तापलेल्या संबंधांमुळे केंद्र आणि गुजरात सरकार यांच्यातला संवाद ठप्प होता.

काँग्रेसचे मंत्री मोदीसमवेत संपर्क ठेवण्यास अजिबात इच्छुक नसायचे आणि काँग्रेसचे नेते यांच्यातल्या दुराव्याचा फटका गुजरातमधल्या जनतेला बसणं योग्य नाही, ही माझी प्रामाणिक धारणा होती. याविषयी मी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी बोललो आणि माझी मतं मांडली.

Sharad Pawar
Lok Maza Sangati: 'शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं आणि..‘ पवारांनी सांगितलं महाविकास आघाडीची जुळणी

प्रगल्भता आणि परिपक्वता अंगी असल्या कारणानं डॉ. मनमोहन सिंग यांनी माझ्याशी सहमती दर्शवत ही जबाबदारी तुम्हीच पार पाडा,' असं सुचवलं. साहजिकच, केंद्र आणि गुजरात यांच्यातल्या संभाषणाचा मार्ग मोकळा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली.

स्वाभाविकपणे केंद्राकडे प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदी माझ्या निवासस्थानी, अथवा कार्यालयात येत असत. त्यातून गुजरातच्या अनेक विषयांवरही तोडगे निघाले.

Sharad Pawar
Ajit Pawar : वज्रमूठ सभेत पोडियम बदलल्याने अजित पवारांनी घेतला आक्षेप? आदित्य ठाकरेंनी काढली समजूत

मोदींच्या आणि माझ्यातल्या स्नेहल संबंधाविषयी जे बोललं जातं, त्याचं मूळ दहा वर्ष केंद्राचा प्रतिनिधी म्हणून मी पार पाडत असलेल्या जबाबदारीत आहे. हे नमूद करणं का आवश्यक आहे. राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रियांमधल्या संवादात अंतर राहिलं, तर अडचणी उभ्या ठाकतात आणि तोच संवाद सुरळीत असेल, तर समस्यांचा निचरा झपाट्यानं होतो.

महत्त्वाच्या व्यक्तीकडे संवादाचं कौशल्य नसेल, तर त्यातून होणारं नुकसान व्यक्तीपुरतं सीमित न राहता, संपूर्ण देशाला सोसावं लागतं. साहजिकच कुणाही नेत्याला संवादाचं वावडं अजिबात समर्थनीय नाही. मात्र गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीचं अवलोकन करताना त्यांचा संवाद मर्यादित होता.

Sharad Pawar
Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंचं मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे..." ; शरद पवारांचा थेट हल्ला

शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात त्याप्रमाणे मोदी मुख्यमंत्री असताना पवारांनी केलेल्या मदतीमुळे या दोघांची मैत्री वाढली. कितीही राजकीय मतभेद असले तरी आजही शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील हे संबंध कधी बिघडले नाहीत आणि हीच त्यांची दोस्ती अनेकांसाठी शंकेचे कारण ठरले हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com