
Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील लॅण्डलाइन फोनकरून त्यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. न्यायालयाने आरोपी नारायणकुमार सोनी याला दोषी ठरवून दीड वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर २ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नारायणकुमार याने फोन केला आणि पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रात्री ८.२० वाजेपर्यंत वारंवार कॉल करून त्रास दिला. याप्रकरणी टेलिफोन ऑपरेटर कृष्णा देऊळकर यांनी माहिती दिल्यानंतर गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि नारायणकुमार याला ताब्यात घेतले.