देशाच्या आर्थिक उभारणीत मिस्त्री कुटुंबाचं योगदान मोठं, सायरस तर... : शरद पवार

Sharad Pawar and Cyrus Mistri
Sharad Pawar and Cyrus Mistri
Updated on

पुणे : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. उद्योग जगतातील तारा निखळल्याच्या प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रांतून उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाविषयी मोठ विधान करत, सायरस यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं. ते साम टिव्हीशी बोलत होते.

Sharad Pawar and Cyrus Mistri
Cyrus Mistri Accident : कार कोण चालवत होते? ‘रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात

शरद पवार म्हणाले की, या देशाच्या आर्थिक उभारणीमध्ये ज्या काही कुटुंबांनी अतिशय मोठं काम केलं त्यामध्ये पारशी समाजाचे अनेक लोक होते. त्यातलं एक कुटुंब असं होतं ज्याचं काम जास्त आणि प्रसिद्धी कमी अस धोरण होतं. ते कुटुंब म्हणजे मिस्त्री परिवार.

शरद पवार पुढं म्हणाले, देशात मिस्त्री कुटुंबाची गुंतवणूक जास्त होती. पण त्यांनी कधी ते बाहेर सांगितलं नाही. सुसंवाद, नम्रता हे त्यांच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य होतं. या कुटुंबाला पुढे नेण्याची कुवत असलेलं नेतृत्व म्हणजे सायरस मिस्त्री. आज त्यांचा अपघात झाला हे अतिशय धक्कादायक वृत्त आहे. मिस्त्री कुटुंबासाठी हे धक्कादायक आहेच. शिवाय आजचा अपघात या देशात गुंतवणूक करणाऱ्या कुटूंबीयांच्या दृष्टीने मोठा धक्का आहे.

Sharad Pawar and Cyrus Mistri
Cyrus Mistry Death: टाटा समूहाचे चेअरमन चंद्रशेखरन यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

सायरस मिस्त्री हे माझ्या नंतरच्या पिढीच्या लोकांचे प्रतिनिधी होते. मिस्त्री यांचा माझी कन्या सुप्रिया आणि जावई सदानंद यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होता. आज सायरस मिस्त्री ज्या पद्धतीने गेले त्याचं दुःख सगळ्यांनाच आहे, असही पवार यांनी नमूद केलं.

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल पल्लोनजी मिस्त्री एक नामवंत उद्योगपती होते. सायरस मिस्त्री यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. सायसर मिस्त्री हे तेव्हा चर्चेत आले जेव्हा 2006 या वर्षी ते टाटा समूहाचे सदस्य बनले. पुढे जाऊन 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्षसुद्धा बनले पण अचानकपणे त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. सध्या ते शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com