Cyrus Mistry Death: टाटा समूहाचे चेअरमन चंद्रशेखरन यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Cyrus Mistry, n chandrashekhar
Cyrus Mistry, n chandrashekhar

नवी दिल्ली : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. उद्योग जगतातील तारा सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. आता टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनीही त्यांच्या माजी चेअरमनला श्रद्धांजली वाहिली आहे. (Cyrus Mistry death news in Marathi)

Cyrus Mistry, n chandrashekhar
Cyrus Mistry Death: दोन मुले आणि पत्नी, जाणून घ्या सायरस मिस्त्री यांच्या परिवाराबद्दल

टाटा समूहाच्या वतीने आदरांजली वाहताना एन. चंद्रशेखरन यांनी सायरस मिस्त्री यांचे स्मरण केले. एवढ्या लहान वयात जगाचा निरोप घेणे खरोखरच दु:खद असल्याचे ते म्हणाले. ते पुढं म्हणाले की, सायरस मिस्त्री यांच्या आकस्मिक आणि अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. सायरस जगण्यासाठी अत्यंत पॅशनेट होते. एवढ्या लहान वयात त्यांचे निधन झाले हे खरोखरच दुःखदायक आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना आणि प्रार्थना, असही चंद्रशेखरन यांनी म्हटलं.

Cyrus Mistry, n chandrashekhar
Cyrus Mistry Death: 100 वर्षांपूर्वीच सायरस मिस्त्रींच्या कुटूंबाची झालेली टाटामध्ये एंट्री

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल पल्लोनजी मिस्त्री एक नामवंत उद्योगपती होते. सायरस मिस्त्री यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. सायसर मिस्त्री हे तेव्हा चर्चेत आले जेव्हा 2006 या वर्षी ते टाटा समूहाचे सदस्य बनले. पुढे जाऊन 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्षसुद्धा बनले पण अचानकपणे त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. सध्या ते शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com