Sharad Pawar : ''समाजातील छोट्या घटकांना मदत न करण्याची सरकारची भूमिका'', मराठा आरक्षणावरुन शरद पवार स्पष्ट बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सुरु आहे. गुरुवारी या मेळाव्याला शरद पवारांनी हजेरी लावली.
sharad pawar on maratha reservation
sharad pawar on maratha reservationesakal

शिर्डीः राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सुरु आहे. गुरुवारी या मेळाव्याला शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी धर्माच्या मुद्द्यावरुन भाजपला धारेवर धरलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, समाजामध्ये आज एक प्रकारची अस्वस्था दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षण.. सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला मदतीची गरज आहे. त्यासाठी आरक्षण द्यावं लागणार आहे.

sharad pawar on maratha reservation
हिजबुलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला दिल्लीत अटक, काश्मीरमधील अनेक घटनांमध्ये होता मुख्य सुत्रधार

''मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. ही मागणी पूर्ण करा परंतु अन्य ओबीसी घटकावर अन्याय होता कामा नये. कुणाच्या ताटातून काढून घेण्याची भूमिका असू नये.'' असं पवार म्हणाले.

मनोज जरांगेंबद्दल बोलताना पवार म्हणाले की, माझी आणि जरांगेंची भेट झाली होती. त्यांनी मला सांगितलं होतं.. सरकारशी बोलणी सुरु आहे. नंतर राज्य सरकारने त्यांना लिखीत स्वरुपात आश्वासन दिलं. आरक्षणाचा लाभ तुमच्या सग्यासोयऱ्यांसह सगळ्यांना मिळेल, अशी मागणी सरकारने मान्य केली होती. त्यामुळे मराठा समाजाला आपली फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे.

पवार पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुढील चार-आठ दिवसांमध्ये राज्य सरकार काहीतरी निर्णय घेणार सांगितलं जातंय. चंद्रकांत पाटील कालपरवा म्हणाले की, एक वर्ष तरी कमीत कमी वेळ लागेल. परंतु मुख्यमंत्री २४ तारखेची वेळ देतात... असं म्हणत पवारांनी शंका उपस्थित केली.

sharad pawar on maratha reservation
Rashmi Shukla: महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांची नियुक्तीची अखेर घोषणा

शरद पवार पुढे म्हणाले, बारामतीला धनगर समाजाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी सरकार आल्यानंतर आरक्षण देतो, असं म्हटलं होतं. परंतु आज ९ वर्षे झाले, त्यांनी काहीही निर्णय घेतला नाही. आमचं सरकार असताना मुस्लिम समाजालाही ५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यांनाही पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची गरज आहे. परंतु नंतर सरकार बदललं आणि मुस्लिमांचं आरक्षण गेलं. सरकारची भूमिका समाजातील लहान घटकांना मदत न करण्याची आहे. सध्या फक्त गाय, गोमुत्र एवढंच दिसत आहे.. असा टोला पवारांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com